Uddhav Thackeray | मला शेतीतलं फार कळत नाही, मला फक्त शेतकऱ्यांचे अश्रू दिसतात

यवतमाळ | वाशिम लोकसभेतील (Washim Lok Sabha) राळेगाव येथील ‘जनसंवाद’ मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. यवतमाळ-वाशिमच्या खासदारांना ज्या जनतेने निवडून दिले त्यांनी केवळ शिवसेनेशी गद्दारी केलेली नाही, तर मतदारांशी केलेली ती गद्दारी आहे.असे ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे.

मोदींना वाटतं, यवतमाळमध्ये सभा घेतली तर जिंकतो. पण ते आता शक्य नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते, पण आता लागवडीचा आणि उत्पादन खर्च दुपटीपेक्षा वाढलंय. तरी हमीभाव देत नाहीत.इथल्या खासदार ज्या भ्रष्टाचारी असल्याचं भाजपवाले सांगत होते, त्यांनी मोदींना राखी बांधली. मग त्या प्रामाणिक आहेत का? असा सवाल देखील त्यांनी केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

मला शेतीतलं फार कळत नाही, मला फक्त शेतकऱ्यांचे अश्रू दिसतात, आणि ते मला पुसायचे आहेत.इथल्या दाभाडीचे शेतकरी जेव्हा मोदींना भेटायला गेले तेव्हा त्यांना मोदींनी भेट नाकारली. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव कसा मिळेल ह्याबाबत मी योजना आणत होतो, पण गद्दारांनी सरकार पाडलं. मी देशातील लुटारुंच्या, हुकूमशहांच्या विरोधात मैदानात उतरलो आहे. अशी डरकाळी त्यांनी फोडली.

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य