ENG vs IND: तीन आक्रमक फलंदाजांचं इंग्लंडच्या संघात पुनरागमन; तगडी फाईट होण्याची चिन्हे

लंडन – भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेट संघांदरम्यान मर्यादित 50 षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज लंडनच्या केन्सिग्टन ओव्हल इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता हा सामना सुरू होईल. मालिकेतला दुसरा सामना 14 जुलै रोजी लॉर्ड्स इथं तर शेवटचा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड इथं 17 जुलै रोजी खेळवला जाणार आहे.

दरम्यान, नुकताच भारतानं टी-20 (T-20) मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. परंतु, एकदिवसीय मालिकेसाठी जो रूट (Joe Root), जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) या प्रमुख त्रिकुटाचं इंग्लंडच्या संघात पुनरागमन होणार आहे. त्यामुळं टी-20 मालिकेच्या तुलनेत एकदिवसीय मालिका जिंकणं भारतासाठी आव्हानात्मक ठरू शकेल.

इग्लंडविरुद्ध नुकतीच पार पडलेल्या टी-20 मालिकेत जॉनी बेअरस्टो, जो रूट आणि बेन स्टोक्स संघाचा भाग नव्हते. परंतु, एकदिवसीय मालिकेत या तिघांचंही पुनरागमन होणार आहे. दरम्यान, भारताचा विचार केला तर काही खेळाडूंनी आपल्या कामगिरीने मागील मालिकेत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. भारताकडे अनुभवी तसेच नव्या ताज्या दमाच्या खेळाडूंचा भरणा असल्याने इंग्लंडला देखील ही मालिका जड जाण्याची शक्यता आहे.