मनसे आणि भाजपवर तुटून पडा; शिवसेनेच्या प्रवक्त्यांना उद्धव ठाकरे यांचे आदेश 

मुंबई : राज्यातील विरोधक हिंदुत्वाच्या (Hindutva)  मुद्द्यामुळे वारंवार शिवसेनेला (Shivsena) खिंडीत गाठत असल्याचे चित्र असून हा मुद्दा किती कळीचा आहे याचा आता प्रत्यय येत आहे. आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शिवसेना प्रवक्त्यांची बैठक (Meeting of Shiv Sena spokesperson) बोलावली होती. त्यामध्ये त्यांनी आता शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेण्याविषयी सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि भाजपवर तुटून पडा असा आदेश दिला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) तसेच भाजपकडून सातत्याने होणाऱ्या टीकेला आता जशास तसे उत्तर देण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचं समजतंय. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेच्या प्रवक्त्यांना भाजप आणि मनसेवर तुटून पडण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच 1 मे रोजी उद्धव ठाकरे हे पुण्यामध्ये जाहीर सभा घेणार असून त्यामध्ये आपण विरोधकांचा समाचार घेऊ असं त्यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, या बैठकीआधी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar)  यांच्यामध्ये वर्षा (varsha) या निवासस्थानी दीड तास चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय.