‘आज मी शेर आहे, पण उद्या कुणीतरी सव्वाशेर येणार आहे, आत्ताचं राजकारण हे पावशेर आहे’

मुंबई – शिवसेनेच्या 56 व्या वर्धापनदिनाच्या (56th Anniversary of Shiv Sena) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज शिवसैनिकांना मार्गदर्शन केले . यावेळी विधान परिषद निवडणुकीवर (Legislative Council elections) देखील त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, मी उद्याची निवडणूक जिंकणारच राज्यसभा निवडणुकीत झाल ते होणार नाही. एकही मत फुटलेले नाही. कुणाचा मत फुटल ते सगळ आलय समोर. असं ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेना आमदार आणि सर्व नेत्यांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी उद्याच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठिशी ठामपणे उभं राहाण्याचं आवाहन केलं. ‘उद्याची निवडणूक आमच्यात फूट पडू शकत नाही हे दाखवणारी आहे. महाराष्ट्र वेगळा विचार करू शकतो हे उद्या आपल्याला देशाला दाखवायचं आहे. असं ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही हे उद्या दाखवायचं आहे. प्रत्येकाला पर्याय असतो. सत्तेचा माज हवा असेल तर जा भाजपाकडे. पण हे किती दिवस चालणार? आज मी शेर आहे, पण उद्या कुणीतरी सव्वाशेर येणार आहे. आत्ताचं राजकारण हे पावशेर आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.