अखेर उद्धव ठाकरे यांचा संभाजीनगरचा दौरा ठरला; शेतकऱ्यांसाठी आता ढाण्या वाघ मैदानात

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पहाणी करणार शेतकऱ्यांच्या नुकसानाचा आढावा घेऊन त्यांना शासकीय मदत तातडीने मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार

मुंबई – मराठवाड्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे . हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे . त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे . तरीही राज्यकर्ते राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता नाही अशी जाहीर विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत .

शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना तातडीने मदत कशी करता येईल याची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे उद्या रविवार दिनांक 23 ऑक्टोबर 22 रोजी संभाजीनगरच्या दौऱ्यावर जाणार आहेत . नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना शासकीय मदत लगेच कशी मिळवून देता येईल यासाठी ते शिवसेनेची यंत्रणा कार्यान्वीत करणार आहेत .