भाजपला फक्त धमकावणं आणि लोकांना विकत घेणं माहिती आहे – तेजस्वी यादव 

पाटणा – JDU नेते नितीश कुमार आणि RJD नेते तेजस्वी यादव (JDU leader Nitish Kumar and RJD leader Tejashwi Yadav) आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनात दुपारी 2 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. द्विसदस्यीय मंत्रिमंडळात नंतर आणखी मंत्र्यांचा समावेश होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) सोडून कुमार आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ते सात पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करणार आहेत. या आघाडीला अपक्षांचा पाठिंबा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन मंत्रिमंडळात जेडीयू (JDU ) व्यतिरिक्त आरजेडी आणि काँग्रेसचे (Congress) प्रतिनिधी असतील. नवीन सरकारची स्वतंत्र ओळख टिकवण्यासाठी डावे पक्ष बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता आहे. राजदसाठी अशा प्रकारे सत्तेचा मार्ग खुला झाल्यांतर तेजस्वी यादव भाजपविरोधात (BJP) पुन्हा आक्रमक झाले आहेत.

तेजस्वी यादव यांनी म्हटलं, प्रादेशिक पक्षांना संपवण्याची भाषा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी केली होती. भाजपला फक्त धमकावणं आणि लोकांना विकत घेणं माहिती आहे. आम्हाला भाजपचा अजेंडा बिहारमध्ये कदापी लागू होऊ द्यायचा नाहीये. भाजपबाबत सौम्य धोरण कदापी घेता कामा नये. आज सर्व पक्षांनी आणि बिहार विधानसभेच्या भाजपच्या सोडून सर्व सदस्यांनी नितीशकुमार यांना आपला नेता मानलं आहे.