Manipal Hospitals | वैद्यकीय मदत अधिक चांगली आणि जलद मिळावी यासाठी मणिपाल हॉस्पिटलने एशियातील पहिले सीटी स्कॅनर केले लॉन्च

Manipal Hospitals Pune | पुणे आणि आसपास राहणाऱ्या लोकांसाठी हेल्थकेअर सहजरित्या प्राप्य आणि परवडण्याजोगी व्हावी यासाठी, मणिपाल हॉस्पिटलने एशियातील पहिले 128-स्लाइस इंजिन्यूइटी सीटी स्कॅनर लॉन्च केले आहे. हे उपकरण अचूकता देते, रेडीएशनचा कमीत कमी संपर्क देते, इमेजचा उत्कृष्ट दर्जा देते, जलद रिपोर्टिंग टाइम शक्य करते आणि रुग्णांसाठी सुरळीत, सोयिस्कर प्रक्रिया प्रदान करते. याच्या बरोबरच मणिपाल हॉस्पिटल, खराडी येथे एक हाय-एंड डिजिटल एक्स-रे प्रणाली देखील इंस्टॉल करण्यात आली आहे, जी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे आणि ती नेमके निदान, अधिक चांगले रिझॉल्युशन, अधिक स्पष्टता आणि अत्यंत तपशीलवार इमेजिस तसेच अधिक प्रभावी उपचार सुनिश्चित करते.

या सीटी स्कॅन मशीनच्या लॉन्च प्रसंगी बोलताना मणिपाल हॉस्पिटल (Manipal Hospitals ), खराडी येथील असोशिएट कन्सल्टंट – रेडियोलॉजी डॉ. रितिका चामडिया म्हणाल्या, “हे सीटी स्कॅन मशीन लॉन्च करून लोकांना दर्जेदार निदान क्षमता प्रदान करण्याचा मणिपाल हॉस्पिटलचा उद्देश आहे. आधुनिक टेक्नॉलॉजी आणि इमेजची अधिक गुणवत्ता असलेले हे नावीन्यपूर्ण उपकरण जुन्या पद्धतींच्या तुलनेत अधिक सुरक्षा आणि मानसिक शांती प्रदान करेल. हे उपकरण आम्हाला अचूक निदान आणि उपचार योजनेबरोबरच रुग्णाच्या स्थितीचे अधिक चांगले आकलन करण्यास सक्षम बनवेल.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

“पुण्यात भाऊ, तात्या कोणी नाही, तर मुरलीधर मोहोळच निवडून येणार”, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Ajit Pawar | “तुम्ही मला मूर्ख समजू नका, मी…”, अजित पवार ‘त्या’ प्रश्नावर भडकले

Vasant More | रवींद्र धंगेकर आमदार होऊनही कसब्यात विकासकामे झाली नाहीत