दुर्दैवाने जरांगे पाटलांच्या जीवाला काही धोका झाला तर….; रोहित पवारांचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil – राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेले आंदोलन तापलंय. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी साखळी आमरण उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. या सहा दिवसांत त्यांनी अन्नाचा कण देखील घेतला नाही. तसेच, दोन-तीन वेळा विशेष विंनतीवरून पाण्याचा घोट घेतला आहे. त्यामुळे आता त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. तर, जरांगे यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे. तर, या सर्व पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटी गावात मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या बांधवांची गर्दी पाहायला मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवारांनी (MLA Rohit Pawar) आपले मत व्यक्त केले आहे. समाजासाठी प्रामाणिकपणे लढणारा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तब्येत क्षणाक्षणाला खालावत चालल्याने त्यांची सर्वांनाच चिंता वाटतेय. अशा परिस्थितीत सरकार नेमकी कशाची वाट बघतंय? असा सवाल त्यांनी केला आहे.

सरकारला थोडीजरी काळजी असेल तर त्वरीत निर्णय घ्या आणि जरांगे पाटील यांची काळजी घ्या… दुर्दैवाने त्यांच्या जीवाला काही धोका झाला तर खोटेपणाची आणि अहंकाराची गोळी खाऊन आपल्याच धुंदीत असलेल्या सरकारला जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळण्याची वेळ येईल. तशी वेळ येऊ देऊ नका, ही कळकळीची विनंती!असं पवार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘मुस्लीम मुलांना महाविद्यालयात जायला वेळ नसतो मात्र जुगार खेळण्यासाठी, दुसऱ्यांना फसवण्यासाठी वेळ असतो’

ज्यांचे पोट रिकामे आहे अशा गोरगरीब जनतेला आरक्षण द्या – Ramdas Kadam

मी ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातं; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली खंत

कुणाच्याही ताटातलं न काढता मराठ्यांना आरक्षण द्या; शरद पवारांची आक्रमक मागणी