मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा, शिंदे गटाचे हेमंत पाटील यांनी सोडली खासदारकी

Hemant Patil Resignation: महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Aarakshan) विषय सर्वाधिक चर्चेत आहे. अंतरवली सराटी येथे गेल्या ६ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच आता मराठा आरक्षणासाठी राजीनाम्याचे सत्र सुरू झाल्याचे दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे ते पहिलेच खासदार आहेत. लोकसभा अध्यक्षांच्या नावानं त्यांनी राजीनाम्यांचं पत्र दिल आहे. हेमंत पाटील हे हिंगोलीचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत.

महाराष्ट्रात मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना तीव्र असून, मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतक-यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनाला माझा पाठिंबा असून, आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असं हेमंत पाटील यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिलंय. हेमंत पाटील यांच्याबरोबरच जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा आणि जरांगे पाटलांची प्रकृती व्यवस्थित राहावी हीच अपेक्षा’

दुर्दैवाने जरांगे पाटलांच्या जीवाला काही धोका झाला तर….; रोहित पवारांचा सरकारला इशारा

कुणाच्याही ताटातलं न काढता मराठ्यांना आरक्षण द्या; शरद पवारांची आक्रमक मागणी