महाराष्ट्र हा काही गांडूची औलाद नाही! संजय राऊतांनी तोफ डागली

मुंबई : खासदार संजय राऊत आणि भाजप यांच्यातील राजकीय वाद आता टोकाला जाण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपच्या साडेतीन नेत्यांची नाव उघड करण्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. या पत्रकार परीषदेला शिवसेनेचे आमदार, खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रावर मराठी माणसांवर जे आक्रमक सुरू आहे. त्या आक्रमणाविरूद्ध कुणीतरी रणशुंग फुंकरायला हवे होते. त्या आपण महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वास्तू मधून फुंकत आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की तुम्ही काही पाप केले नसतील तर कुणाच्या बापाला घाबरायच नाही, असं संजय राऊत म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आज उद्धव ठाकरे हे देखील शिवसेना पुढे नेत आहेत. आजची पत्रकार परिषदमधून संदेश द्यायचा आहे की महाराष्ट्र गांडूची औलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही. तसेच तुम्ही कितीही ना मर्दनागी करून आमच्या पाठीमागे वार केले तर शिवसेना मागे हटणार नाही. यासाठीच आजची पत्रकार परिषद असल्याचं संजय राऊत यांनी सांगितले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना शिवसेना भवन याठिकाणी येण्यासाठी आव्हान केले होते. त्यांच्या या आव्हानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर गर्दी केली होती. त्या सगळ्यांना पत्रकार परिषद बघता येईल याठिकाणी शिवसेना भवनासमोर एलइडी लावण्यात आली होती.