भारत जोडो यात्रेत नितीन राऊत यांना धक्काबुक्की; रुग्णालयात करावे लागले दाखल

नवी दिल्ली – ‘भारत जोडो यात्रे’मध्ये सहभागी असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत (Nitin Raut) गंभीर जखमी झाले आहेत. वृत्तानुसार, तेलंगणामध्ये प्रवासादरम्यान पोलिसांनी त्यांना कथितपणे ढकलले होते, यात ते जखमी झाले. राऊत यांच्या उजव्या डोळ्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पक्षाच्या काही सदस्यांनी असा दावा केला की त्यांना एसीपीने धक्काबुक्की केली होती. काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची भेट घेतली. दरम्यान, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात 11 दिवस चालणार आहे. 7 नोव्हेंबरला ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे पोहोचणार आहे. देगलूरमध्ये ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचणार असून, यात्रेच्या सत्कारासाठी देगलूर नगरपरिषदेकडून सर्व तयारी करण्यात आली आहे.