ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात घाण करण्याची गुलाबराव पाटील यांची वृत्ती – अंधारे

जळगाव – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज धरणगाव येथे प्रबोधन सभा घेऊन शिंदे गटावर (Shinde Faction) चौफेर टीका केली. यातही गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर अंधारे यांनी सडकून टीका केली. मी तुम्हाला सळो की पळो करून सोडणार, आज तुम्हाला झोप येणार नाही, असा इशाराच त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना दिला आहे.

आमचे नेतृत्व हे संयमी व शिस्तबद्ध आहे. आमचे 40 भाऊ तिकडे गेले आहे, त्यातील एक शेरो शायरी करणारे भाऊ गुलाबराव पाटील. एकाच घरात किती दिवस सत्ता ठेवायची असे गुलाबराव पाटील म्हणतात. मात्र, ते कधीपासून पद भोगत आहेत. गुलाबराव पाटील यांनी स्वतःचा चेहरा आरशात पाहावा. तुम्ही 20 वर्ष वेगवेगळ्या मार्गाने सत्ता भोगत आहात. मग इतर कार्यकर्त्यांना तुम्ही पुढे करून त्यांना सत्तेवर का आणलं नाही? ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात घाण करण्याची वृत्ती असल्याची टीका गुलाबराव पाटील यांच्यावर केली.