एक्स बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून वैशाली ठक्करने केली आत्महत्या? 

इंदोर – ‘ससुराल सिमर का’मध्ये दीपिका कक्करची मुलगी बनलेली अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) आता आपल्यात नाही. इंदूर येथील राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. अभिनेत्री फक्त 29 वर्षांची होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच आतून हादरवून सोडले. घटनास्थळावरून पोलिसांना सुसाईड नोटही (Vaishali Thakkar Suicide) सापडली आहे. ज्यामध्ये पूर्वी तिचा एक्स बॉयफ्रेंड तिला त्रास देत असे. आता यात शेजाऱ्याचेही नाव असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली टक्कर हिने दुपारी साडे बारा वाजता आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि त्यानंतर अभिनेत्रीचे अंतिम संस्कार करण्यात आले. आता पोलिसांनी सांगितले आहे की, अभिनेत्री इंदूरच्या साईबाग कॉलनीत राहायची. हा परिसर तेजाजी पोलिस ठाण्यांतर्गत येतो.

वैशाली ठक्कर हिने शेजारीच राहत असलेल्या तिच्या एक्स बॉयफ्रेंडमुळे आत्महत्या केली असे सांगितले जात आहे. आत्महत्या झालेल्या ठिकाणी पोलिसांची जेव्हा टीम तिथे पोहोचली, तेव्हा त्यांना एक सुसाईड नोट देखील सापडली, ज्यामध्ये ती नाराज असल्याचे लिहिले होते. या नोटमध्ये तिचा शेजारी ज्याचे नाव राहुल नवलानी असून तो व्यवसायाने तिला त्रास देत असे असं लिहिले आहे. तो तिच्या कुटुंबिंयाच्या परिचयाचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

एसीपी मोती उर रहमान यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले – राहुल वैशालीचा शेजारी होता. तो वैशालीचा छळ करत असे या सुसाईड नोटवरून दिसून येत आहे. त्यामुळेच तिने एवढं मोठं पाऊल उचललं. ती दुसर्‍या कोणाशी तरी लग्न करणार होती आणि राहुल तिला याबद्दल त्रास देत होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

राहुलचे लग्न झाले असून तो घराला कुलूप लावून फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांची टीम सध्या त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत असून त्यानंतर त्याची चौकशी केली जाईल. वैशालीशी संबंधित अनेक वस्तू जप्त करण्यात आल्याचे एसीपीने सांगितले आहे. त्यात तिच्या डायरीचाही समावेश आहे, ज्यामध्ये त्याने नैराश्याचा उल्लेख केला आहे. यासोबतच अशा काही लोकांची नावेही लिहिली आहेत, ज्यांचा या प्रकरणाशी संबंध असू शकतो.