पहिल्याच नजरेत अमृता यांच्या पडले प्रेमात पडले देवेंद्र फडणवीस, खूप खास आहे दोघांची लव्हस्टोरी!

Mumbai: आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोण ओळखत नाही. ते एक प्रसिद्ध राजकारणी असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. सध्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी कार्यरत असणाऱ्या देवेंद्र फडणवीस याना राजकारणाचा वारसा कुटुंबातूनच मिळाला असला तरी आपल्या वडिलांपासून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पत्नीचे नाव अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आहे. देवेंद्र फडणवीस यांची अमृता यांना भेटण्यापासून ते मैत्री आणि लग्नापर्यंतची कहाणी (Devendra Fadnavis Love Story) खूप रंजक आहे.

एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, त्यांची पत्नी हुबेहुब बॉलिवूड अभिनेत्री काजोलसारखी दिसते. तिला पहिल्याच नजरेत पाहून त्यांनी अमृता यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. (Valentine Day)

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या नागपूरच्या प्रसिद्ध डॉ. चारू रानडे आणि नेत्रतज्ज्ञ डॉ. शरद रानडे यांच्या कन्या आहेत. 2005 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांनी लग्न केले. देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांचा विवाह झाला तेव्हा फडणवीस आमदार म्हणून दुसऱ्या टर्ममध्ये होते. त्यांना देवीजा नावाची मुलगीही आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांचा विवाह नागपुरातील प्रसिद्ध फुटाळा तलावाच्या काठावरील बोटॅनिकल गार्डनमध्ये पार पडला. या लग्नाला जवळपास 500-600 लोक पोहोचले होते, त्यात नागपूरच्या अनेक झोपडपट्ट्यांतील लोकांचाही समावेश होता. त्यामुळे त्यांचा विवाह नागपुरात चांगलाच गाजला होता. देवेंद्र फडणवीस यांना बॉलिवूड अभिनेत्री काजोल खूप आवडते. असे म्हटले जाते की जेव्हा त्यांनी अमृता यांना पहिल्यांदा पाहिले, तेव्हा त्यांनी अमृता यांना सांगितले की तू हुबेहूब काजोलसारखी दिसतेस. त्यानंतर त्यांनी अमृता यांना लग्नासाठी मागणी घातली होती.

अमृता फडणवीस सध्या अॅक्सिस बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. याशिवाय त्या शास्त्रीय गीत गायकही आहेत. त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार, एका कार्यक्रमादरम्यान अमृता यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सांगितले होते की, ते भावनिक व्यक्ती आहेत. त्यांनी सांगितले होते की, एकदा फडणवीस आमिर खानचा ‘थ्री इडियट्स’ चित्रपट पाहत असताना एका सीनमुळे रडले होते.