पवार साहेबांसारखा विश्वासघातकी माणूस देशात नाही, पवार कुटुंब पूर्ण नासक्या मेंदूचं- राणे

मुंबई- नोव्हेंबर 2019 चा पहाटेचा शपथविधीची माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना होती असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांनी काल केला आहे. त्यावर ‘देवेंद्र फडवणीस हे सुसंस्कृत आणि सभ्य आहेत त्यांनी असत्याचा आधार घेऊन असे बोलायला नको होते’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्व शरद पवार यांनी दिली आहे.

यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशातच भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी शरद पवार यांना विश्वासघातकी संबोधत पवार कुटुंबावर टीकास्त्र सोडले आहे.

‘पवार साहेबांसारखा विश्वासघातकी माणूस देशात दुसरा नाही, पवार कुटुंब पूर्ण नासक्या मेंदूचं आहे. आयुष्यभर फक्त टोप्या लावायचं काम पवार कुटुंबाने केलं, मी मागे बोललो होतो फडणवीस साहेब जेव्हा पहाटेच्या शपथविधी बद्दल महाराष्ट्राला सांगतील तेव्हा पवारांना तोंड लपवायला जागा राहणार नाही,’ अशी तिखट प्रतिक्रिया निलेश राणे यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.