चंद्रकांत खैरे दिसतील तिथे त्याचं तोंड काळे करू – वंचित बहुजन आघाडी

औरंगाबाद – लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजपकडून (BJP) पैसे घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे (Senior Shiv Sena leader and former MP Chandrakant Khaire) यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे वंचित बहुजन आघाडी (VBA) चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे.  खैरे यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा खैरे दिसतील तिथे त्याचं तोंड काळे करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे.  खोटे आणि निराधार आरोप करणाऱ्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार असून खैरेंनी तयार राहावे, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले (Aurangabad District President of Vanchit Bahujan Aghadi Prabhakar Bakle) यांनी म्हटलं आहे की, चंद्रकांत खैरे यांना आम्ही दोन दिवसांचा वेळ दिला आहे. ज्याप्रमाणे खैरेंनी जालन्यात पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीवर आरोप केले आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद शहरात कुठेही पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर माफी मागा. दोन दिवसात त्यांनी माफी मागितली नाही तर, खैरे दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासणार असा इशारा बकले यांनी दिला आहे.