Suresh Birajdar | लोकसभेची उमेदवारी नाकारलेल्या सुरेश बिराजदार यांना अजित पवारांनी दिला शब्द, विधानसभेशी आहे संबंध

अजित पवार गटाकडून धाराशिव लोकसभेसाठी सुरेश बिराजदार (Suresh Birajdar) यांना निवडणुकीसाठी तयारी करण्याचे अजित पवारांनी आदेश दिले होते. मात्र महायुतीच्या नेत्यांनी तसेच अजित पवारांनी अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्याने बिराजदार थोडे नाराज झाल्याचे दिसून आले. मात्र आता सुरेश बिराजदार यांची नाराजी दूर करत अजित पवारांनी त्यांना एक शब्द दिला आहे. त्यामुळे बिराजदार (Suresh Birajdar) यांनी अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी हिरीरीने सहभागी झालेत.

काल महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी काल मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत सहभाग घेतला. यावेळी महायुतीचे सर्वच नेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असता भरसभेत अजित पवारांनी सुरेश बिराजदार यांना लोकसभेऐवजी विधानपरिषदेवर संधी देऊ असं आश्वासन दिलं. यावरून अजित पवारांनी धाराशिवमधील डॅमेज कंट्रोल दुर करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर आमनेसामने आले होते. यावेळी राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे या लढतीकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला