तीन लग्न मोडली, आता गर्लफ्रेंडही सोडून गेली, ६१ वर्षीय अभिनेत्याचे पुन्हा एकदा तुटले हृदय

Tom Cruise Breask Up:  हॉलिवूड स्टार टॉम क्रूझबाबत (Tom Cruise) एक मोठी बातमी समोर आली आहे. वयाच्या 61व्या वर्षी या अभिनेत्याचे हृदय पुन्हा एकदा तुटले आहे. टॉम क्रूझ आणि त्याची रशियन गर्लफ्रेंड अलेसिना खैरोवा यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगण्यात येत आहे.

वयाच्या 61 व्या वर्षी टॉम क्रूझचे हृदय पुन्हा तुटले
टॉम क्रूझने ( Tom Cruise) त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे नाते संपुष्टात आणल्याचा दावा केला जात आहे. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. 13 फेब्रुवारी रोजी, अभिनेत्याने सोशल मीडियावर अल्सीना खैरोवासोबतचे नाते अधिकृत केले होते. आणि या घोषणेच्या अवघ्या 10 दिवसांनी त्यांच्या ब्रेकअपची बातमीही समोर आली. टॉम क्रूझने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अल्सीना खैरोवाचा फोटोही डिलीट केला आहे.

वयाने 25 वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप
टॉम क्रूझ आणि अलेसिना खैरोवा या दोघांच्या वयात 25 वर्षांचा फरक आहे. त्यांच्या ब्रेकअपची अनेक कारणे सांगितली जात आहेत. काही लोक म्हणतात की टॉम क्रूझने अल्सीना खैरोवाचे हृदय तोडले, तर बरेच लोक यासाठी त्याच्या गर्लफ्रेंडला दोष देतात. हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्ये एकत्र राहत असल्याच्या बातम्या आहेत. यावेळी, अभिनेत्याने त्याच्या गर्लफ्रेंडच्या मुलांचीही भेट घेतली. या भेटीनंतरच टॉम क्रूझने अल्सीनापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

द यूएस सन या इंग्रजी वेबसाइटनुसार, टॉम क्रूझ आणि अलेसिना खैरोवा लंडनमध्ये एअर ॲम्ब्युलन्स चॅरिटीच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या गाला डिनर दरम्यान दिसले होते. दोघेही इथे वेगळे पोहोचले होते, त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या पसरू लागल्या. मात्र, आतापर्यंत दोघांनीही या वृत्तांवर कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

तीन विवाह अयशस्वी झाले
दरम्यान अभिनेत्याचे हृदय तुटण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याच्या अनेक गर्लफ्रेंड होत्या. टॉम क्रूझचे तीन लग्नही अयशस्वी झाले आहेत. टॉम क्रूजला या लग्नांमधून तीन मुलेही आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ दिवशी मुंबई इंडियन्स खेळणार आयपीएल २०२४चा पहिला सामना, पाहा पंड्याचे संघाचे वेळापत्रक

Sharad Pawar | सगळं दिलं पण पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, शरद पवार यांचा हल्लाबोल

मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे Ajit Pawar यांचे निर्देश; मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार