अपक्ष आणि लहान पक्ष महाविकास आघाडीतील कुणाला मतदान करणार याबाबत संभ्रम कायम

मुंबई – विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) १० जागांसाठी येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतांची जुळवाजुळव केली जात आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी कोण कसं मतांचं गणित जुळवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीतच कुरघोड्या सुरू झाल्या आहेत.

विधानपरिषद निवडणुकीच्या (Legislative Council elections) आदल्या दिवसापर्यंत अपक्ष आणि लहान पक्ष महाविकास आघाडीतील कुणाला मतदान करणार याबाबत  संभ्रम कायम असल्याचे चित्र आहे.  आज संध्याकाळपर्यंत अपक्षांना आणि लहान पक्षांच्या आमदारांना मतदानाबाबत निरोप मिळणार  असल्याचं सांगितले जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची संध्याकाळी बैठक होईल यात अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांच्या मतांची जुळवाजुळव कशी करायची हे ठरेल. राज्यसभा निवडणूूकीत उशीरा निरोप मिळाल्यानं लहान पक्षांच्या आमदारांनी नेमके कुणाला मतदान करायचे याबाबत बराच गोंधळ झाला होता यावेळी तसा गोंधळ होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे.

काल समाजवादी पार्टी आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Samajwadi Party and Congress leader Balasaheb Thorat) यांच्यात बैठक पार पडली मात्र, त्यानंतर सपानं काँग्रेसला मतदान करायचे की राष्ट्रवादीला यावर अद्याप अंतीम निर्णय झाला नाही  तसेच, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) आणि काँग्रेस नेत्यांचीही बैठक झाली त्यानंतर आज अपक्षांच्या मताबाबत निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात येत आहे.