Govt Scheme : सुधारित बीज भांडवल योजना नेमकी काय आहे ?

लाभाचे स्वरूप
■ बीज भांडवल कर्जाचे प्रमाण बँक तसेच वित्तीय संस्थानी मंजूर केलेल्या प्रकल्प खर्चाच्या १५ ते २० टक्के. कर्जाची कमाल मर्यादा ३.७५ लाख.
■ दहा लाखा पेक्षा कमी प्रकल्प खर्च असलेल्या प्रकल्पामध्ये बीज भांडवल कर्जाचे प्रमाण अनुसूचित जाती व जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना २० टक्के.
■ बीज भांडवल सहाय्यावर आकारावयाचे व्याज- बीज भांडवलाची रक्कम मृदू कर्ज (सॉफ्ट लोन) म्हणून दरसाल ६ टक्के व्याज.
■ नियमितपणे विहीत कालावधीत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना ३ टक्के परतावा (रिबेट).

योजनेच्या अटी व शर्ती
■ वयोमर्यादा १८ ते ५० वर्षापर्यंत.
■ सातवी पास असा स्थानिक व्यक्ती किंवा कायदेशीर तरतूदी प्रमाणे एकत्र आलेला व्यक्तीचा समूह.
■ अर्जदारापैकी एखादी व्यक्ती आधीच नोकरी करीत असेल तर कर्ज वितरित होण्यापूर्वी नोकरीतून राजीनामा देणे आवश्यक आहे. तथापि अर्ज करतांना नोकरीतून राजीनामा देण्याचे हमीपत्र देणे आवश्यक.
■ भागीदारातील संस्था, खाजगी मर्यादीत कंपनी आणि सहकारी संस्थांच्या उत्पादक घटकामधील बीज भांडवल योजना लाभ घेण्यास पात्र व्यक्ती बहुसंख्येने असून सक्रीय असतील आणि प्रकल्पातील त्यांचे सहभाग भांडवल किमान ७६ टक्के असेल तर असे उद्योग घटक बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्यास पात्र.

अधिक माहितीसाठी संपर्क: महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे