Sangeeta Wankhede | जरांगेला संपलेला पक्ष उभा करायचा आहे, संगीता वानखेडे यांची जरांगें पाटलांवर पुन्हा आक्रमक टीका

Sangeeta Wankhede | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची सभा करमाळा तालुक्यातील दिवे गव्हाण येथे झाली. परंतु, या सभेला अपेक्षित जनसमुदाय हजर नव्हता. यावरुन संगीता वानखेडे (Sangeeta Wankhede) यांनी मनोज जरांगेवर निशाणा साधला आहे. जरांगे तोंडावर पडलेले आहेत, मराठा समाजाला जरांगे यांचा खरा चेहरा कळालेला आहे, असे म्हणत संगीता वानखेडे यांनी जरांगें पाटलांवर पुन्हा आक्रमक टीका केली आहे.

जरागेला काय करायचं आहे? जरांगे कोणाचा माणूस आहे? जरांगे कोणाचा प्यादा आहे? त्याला कशासाठी उभं केलं हे मी यापूर्वी सांगितलं होतं. शरद पवारांचा संपलेला पक्ष उभा करण्यासाठी शरद पवारांनी जरांगे नावाचा प्यादा उभा केलेला आहे. जरांगेला संपलेला पक्ष उभा करायचा आहे. त्याला शरद पवार गटाला आणि उद्धव ठाकरे गटाला सपोर्ट करायचा आहे, असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी पुन्हा एकदा केला आहे. तसेच आपल्याला कितीही त्रास दिला तरी आपण खरं बोलणं थांबवणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, मोहोळांचा घरोघरी जाऊन प्रचार

विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान – मिटकरी

Mahadev Jankar : महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार, एक जागा ‘रासप’ला दिली जाणार