… अन्यथा, मला काय काकांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न कधी पूर्ण होईल असं वाटत नाही – पडळकर

मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांची पोस्टर्स झळकवली. त्या पाठोपाठ मुंबईत राष्ट्रवादी कार्यालयासमोर खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या नावाची देखील भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकली होती. या पार्श्वभूमीवरच आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत खोचक टीका केली आहे.

पडळकर म्हणाले, “लवासा, मगरपट्टा, बारामती ही तीन छोटी राज्ये स्थापन करून तिघांना मुख्यमंत्री व या राज्यांचा एक देश स्थापन करून काकांना पंतप्रधान केलं पाहिजे, तेव्हाच यांचं स्वप्न पूर्ण होईल. अन्यथा, मला काय यांचं स्वप्न कधी पूर्ण होईल असं वाटत नाही, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.