World Cup: धावांच्या शर्यतीत विराट पुन्हा पुढे, जाणून घ्या कोण कुठल्या बाबतीत आहे आघाडीवर 

WC 2023 Stats:  विश्वचषक 2023 मध्ये (World Cup 2023) सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या त्याच्या 88 धावांच्या खेळीने त्याला पुन्हा धावांच्या या शर्यतीत पुढे नेले आहे. याआधी तो टॉप-5मधून बाहेर होता. दुसरीकडे, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका विकेट घेण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. गुरुवारी त्याने टीम इंडियाविरुद्ध 5 विकेट घेतल्या. जाणून घ्या या विश्वचषकाची टॉप आकडेवारी…

सर्वोच्च धावसंख्या: 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट गमावून 428 धावांची मोठी धावसंख्या उभारली.
सर्वात मोठा विजय: 25 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा 309 धावांच्या फरकाने पराभव केला.
सर्वाधिक धावा: दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने या विश्वचषकात ५४५ धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर विराट (442) दुसऱ्या स्थानावर आणि किवी फलंदाज रचिन रवींद्र (415) तिसऱ्या स्थानावर आहे.
सर्वात मोठी खेळी : हा विक्रमही क्विंटन डी कॉकच्या नावावर आहे. 24 ऑक्टोबर रोजी त्याने वानखेडेवर बांगलादेशविरुद्ध 174 धावांची खेळी खेळली.
सर्वाधिक शतके: येथेही डी कॉक नंबर-1 आहे. या विश्वचषकात त्याने चार शतके झळकावली आहेत.
सर्वाधिक षटकार: रोहित शर्माने आतापर्यंत 20 षटकार मारले आहेत. डेव्हिड वॉर्नर (19) दुसऱ्या स्थानावर तर डी कॉक (18) तिसऱ्या स्थानावर आहे.
सर्वाधिक विकेट्स : श्रीलंकेचा दिलशान मदुशंका १६ विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा अॅडम झाम्पा, पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्को यानसिन यांचा क्रमांक लागतो. तिघांनीही 16-16 विकेट घेतल्या आहेत.
सर्वोत्तम गोलंदाजी खेळी: भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 2 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध केवळ 18 धावा देऊन 5 बळी घेतले.
सर्वोत्तम इकॉनॉमी रेट: आर अश्विन येथे अव्वल आहे. या विश्वचषकात त्याने 10 षटके टाकली असून केवळ 34 धावा दिल्या आहेत.
सर्वात मोठी भागीदारी: न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडविरुद्ध २७३ धावांची भागीदारी केली.

महत्वाचे बातम्या-

ते सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते; प्रकाश सोळंके यांनी सांगितली आपबीती

मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद; म्हणाले,….

राज्य सरकारला 2 जानेवारीची डेडलाईन; अखेर मनोज जरांगे यांचं उपोषण मागे