‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ काश्मीरमधील आणखी शाळा दत्तक घेणार – पुनीत बालन

‘‘डॅगर परिवार स्कूल’’चा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Punit Balan: काश्मीरमधील बारामुल्ला भागात ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ (Indrani Balan Foundation)  आणि ‘चिनार कॉर्प्स’ यांच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या विशेष मुलांच्या ‘‘डॅगर परिवार स्कूल’’ चा दुसरा वर्धापन दिन नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात दिव्यांग मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी काश्मीर खोऱ्यात आणखी शाळा दप्तक घेण्याची घोषणा फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि युवा उद्योगपती पुनीत बालन यांनी केली.

दहशतीच्या छायेत वा़ढणाऱ्या काश्मिरमधील बारामुला जिल्ह्यात ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ आणि ‘चिनार कॉर्प्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्टोंबर 2021 पासून डॅगर परिवाराच्या माध्यमातून दिव्यांग मुलांसाठी शाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळेत सद्यस्थितीला 103 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेच्या दुसरा वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला फाऊंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन, ‘आरएमडी फाऊंडेशन’च्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल-बालन, 19 इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर जनरल राजेश सेठी यांच्यासह लष्कराचे अनेक अधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या विशेष विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि नृत्य सादर करून उपस्थितांनी मने जिंकली.

यावेळी जान्हवी धारीवाल-बालन म्हणाल्या, ‘‘काश्मीरमध्ये फाऊंडेशनने लष्कराच्या सहकार्याने 11 शाळा सुरू केल्या आहेत, त्यापैकी असलेली ही विशेष मुलांची शाळा आहे. या मुलांमध्ये सामान्य मुलांपेक्षा अधिक क्षमता आहेत, अशा मुलांना अनेक योग्य संधी उपलब्ध करून देणे हा फाऊंडेशनचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून ते अधिक प्रगती करू शकतील.’’

मेजर जनरल राजेश सेठी म्हणाले की, ‘‘इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या सहकार्याने लष्कर निश्चितपणे शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करेल. ज्यामुळे जास्तीत जास्त मुलांना येथील संधी उपलब्ध होऊ शकतील आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळू शकेल.’’ या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पालकांनी भारतीय लष्कर आणि फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.

‘‘इंद्राणी बालन फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या शाळांमधून काश्मीरची नवीन पिढी घडत आहे. काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच टॅलेंट आहे. त्यामुळे दहशतीच्या छायेत वाढणाऱ्या या विद्यार्थांमधून भविष्यात आपल्या देशाला पुढे घेऊन जाणारे हिरे तयार होतील असा विश्वास आम्हाला आहे. त्यामुळे पुढील काळात नव्याने आणखी काही शाळा आम्ही सुरू करण्याचे आमचे नियोजन आहे.’’ – पुनीत बालन, अध्यक्ष, इंद्राणी बालन फाउंडेशन.

महत्वाचे बातम्या-

ते सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते; प्रकाश सोळंके यांनी सांगितली आपबीती

मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद; म्हणाले,….

राज्य सरकारला 2 जानेवारीची डेडलाईन; अखेर मनोज जरांगे यांचं उपोषण मागे