ब्राह्मणद्वेष म्हणजे पुरोगामीत्व? पुरोगाम्यांची संपली चळवळ, उरली फक्त मळमळ? 

विश्वजीत देशपांडे :  जगभरात डाव्या आणि उजव्या विचारांचा संघर्ष सुरु आहे तो असतोच. वैचारिक मतभिन्नता असणे गैर नाही उलट भारतात वैचारिक मतभिन्नतेची मोठी परंपरा आहे. वैचारिक द्वंद्वातून समुद्रमंथनातून निघाले तसे विचारांचे अमृत निघावे ज्याचा समाजाला, देशाला खऱ्या अर्थाने फायदा व्हावा असे अपेक्षित असते परंतु सध्या सुरु असलेल्या संघर्षातून फक्त ब्राह्मण द्वेषाचे विषच बाहेर पडताना दिसत आहे कारण पुरोगामी विचारच गंडला आहे. ब्राह्मणद्वेषापायी मोठ मोठे विचारवंत आपली पातळी सोडून लिहू बोलू लागले आहेत.

ब्राह्मण पुरोगामी कि प्रतिगामी
या देशातल्या जडणघडणीत जवळपास सर्वच विचारसरणीत ब्राह्मण अग्रणी होते काँग्रेस, डावे, जनसंघ, जनता दल कोणताही पक्ष घ्या त्यांच्या सुरुवातीच्या काळात शीर्ष नेतृत्व ब्राह्मणांचेच राहिले आहे. शिक्षणामुळे येणारी प्रगल्भता ब्राह्मणांमध्ये थोडी लवकर आली त्यामुळेच आपापल्या आवडीनुसार प्रत्येकजण विचार करू लागला मांडू लागला आजही ब्राह्मण शिक्षणात, सेवा कार्यात, उद्योग धंद्यात, प्रबोधनात, अग्रेसर आहे कारण काळाची पाऊले ओळखून कालानुरूप बदल स्वीकारून स्वतःला उन्नत करणे हा ब्राह्मणांचा स्थायीभाव आहे परंतु भारतीय संविधानाचे काटेकोर पालन करणारा कुठलीही कर बुडवेगिरी न करणारा सचोटीने जगणारा ब्राह्मण पुरोगाम्यांना प्रतिगामी का वाटावा ? पुरोगामीत्वाची यांची व्याख्याच मुळात गंडलीये ब्राह्मणद्वेष म्हणजे पुरोगामीत्व पर्यायाने हिंदू द्वेष म्हणजे पुरोगामीत्व ही आजची पुरोगामी व्याख्या आहे.

भिडे गुरुजी आणि वाद
आदरणीय संभाजीराव भिडे गुरूजींनी श्री शिवप्रतिष्ठान संघटनेच्या माध्यमातून लाखो तरुणांना शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित प्रशिक्षण दिले गडकोट मोहीमा काढून भरकटत जाणारी तरुणाई योग्य मार्गावर आणण्याचे कार्य केले स्पष्टच त्यांच्यावर सतत पुरोगाम्यांच्या राग असण्याचे एकमेव कारण गुरुजींची जात एवढेच असते. श्री संभाजीराव भिडे गुरुजींचे नाव मनोहर कुलकर्णी आहे हा एक जावई शोध काहींनी लावला गेल्या दहा वर्षात याचा एकही सबळ पुरावा देऊ शकले नाहीत तरीही सतत ही कोल्हेकुई सुरूच असते. गुरुजींनी नुकत्याच एका पुस्तकातील महात्मा गांधी यांच्याबाबत एका पुस्तकातील उतारा उधृत केला यावरून तोबा गहजब माजला मोर्चे आंदोलन सर्वकाही झाल पण कुणी त्या पुस्तकात काहीतरी लिहून ठेवलय त्याची सत्यता तपासायला नको का ? एरव्ही आमच्या धर्माची चिकित्सा करायला फार मजा येते ना मग येऊ द्या की इथेही सत्य बाहेर शेवटी सत्य हे देखील गांधींचे महत्वाचे तत्व होते ना मग सत्याला का घाबरता ?

भालचंद्र गेमाडेंचा म्हातारचळ
भालचंद्र नेमाड्यांनी एका आशा कार्यक्रमात असे बेताल वक्तव्य केले आहे त्यात सुसंगती शोधायची झाली तर ती एकच सापडते ती म्हणजे व्यासपीठावर असलेले बारामतीचे वयोवृद्ध पुढारी श्री शरद पवार यांचे व्यासपीठावर असणे. मराठा साम्राज्याच्या सुवर्णकाळात तब्बल एकवीस वर्ष स्वराज्याचे पंतप्रधान राहिलेल्या नानासाहेब पेशव्यांसारख्या सूर्यावर असे कितीही गेमाडे बोलले तरी काहीच फरक पडणार नाही इतिहासातून तुम्हाला पेशवाई पुसता येणार नाही कटक ते अटक साम्राज्यविस्तार पेशवाईत झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पेशव्यांनी साकार केले तरीही अटकेपार पोचले ते मराठे आणि पानिपतात हरले ते पेशवे म्हणायची पुरोगामी पद्धत फक्त पेशव्यांच्या जातीमुळे ? अपराजित योद्धा श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा पराक्रम संगण्याऐवजी मस्तानी बाई बद्दल अधिक बोलायचे हीच पुरोगाम्यांची चाल आहे.

औरंगजेबाच्या कुणा राण्यांवर म्हणे ब्राह्मण पुजाऱ्यांनी अत्याचार केले आणि म्हणून औरंजेबाने काशी विश्वेश्वराचे मंदीर पाडले. या पेक्षा मोठा हास्यास्पद दावा गेल्या कित्येक दशकात झाला नसेल महाराष्ट्राची हास्यजत्रा म्हणून जो कार्यक्रम टीव्ही वर येतो तेथे या नेमाड्यांना सोंगाड्या म्हणून पाठवले पाहिजे तिथे पुरुषांच्या बायकाही केल्या जातात तेवढीच म्हाताऱ्याची हौस पुरी होईल. असो तर पुजाऱ्यांनी तळघरात तेही मुघल सम्राट औरंगजेबाच्या बायकोवर अति प्रसंग केला असेल तर किती खतरनाक असतील हे ब्राह्मण ? आणि हे जर खरच असेल तर चला आम्हाला अभिमान आहे त्या पुजाऱ्यांचा मुघलांनी बाटवलेल्या शेकडो हिंदू स्त्रियांच्या अपमानाचा बदला घेतला त्यांनी असे समाजा.

राजकारणातला कृत्रिम शत्रू ब्राह्मण
बहुतांश ब्राह्मण भाजप सोबतच का आहेत असा काहींचा आक्षेप असतो याला जेवढे हे कारणीभूत आहेत तेवढेच ते देखील कारणीभूत आहेत. 95% ब्राह्मण समाज भाजप सोबत का जातो ? कारण गेल्या 25 वर्षात महाराष्ट्रात ब्राह्मण नावाचा एक कृत्रिम शत्रू समाजासमोर उभा केला व त्याद्वारे बहुजन समाजाला आपल्या बाजूला आणण्याचे षडयंत्र शरद पवार, ब्रिगेड, विविध जातीयवादी इतिहासकार या सर्वांनी मिळून केले व टाकलेल्या डावाला सर्वचजण बळी पडले. जेव्हा भांडारकर संस्थेवर हल्ला झाला किंवा दादोजींचे पाय तोडले तेव्हा काँग्रेस वेगळी भूमिका घेऊ शकली असती पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली याचा परिणाम पुढे असा झाला कि 1991 च्या खुल्या आर्थिक धोरणानंतर नोकऱ्या मिळू लागल्याने मोठ्या प्रमाणात ब्राह्मण लोक शहरात स्थलांतरित झाले जवळपास सर्व जिल्ह्याची ठिकाणे व महानगरात ब्राह्मण टक्का आज मोठा काही विधानसभा मतदारसंघ जसे कोथरूड कसबा खडकवासला औरंगाबाद पूर्व परभणी नांदेड पूर्व बीड नागपूर पार्ला डोंबिवली ठाणे आणि असे अनेक जिथे 10% पेक्षा अधिक ब्राह्मण आहेत जो मतदार विशेष प्रयत्न न करता भाजप ला मिळाला आहे. महाराष्ट्रात चाळीस पेक्षा अधिक परिणामकारक ब्राह्मण मतसंख्या असलेले मतदारसंघ आहेत लोकसभेचे सहा मतदारसंघ असे आहेत जिथे 15% हुन अधिक ब्राह्मण मतसंख्या आहे. आम्ही जर ठरवले तर चाळीस आमदार व सहा खासदार स्वतःचे निवडून आणु शकू पण आजही ब्राह्मण आपल्या विचारधारेशी प्रामाणिक आहे स्वार्थ बाजूला ठेऊन राष्ट्रप्रथम हि शिकवणच  आमचे बाळकडू आहे.