‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केली त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा

मुंबई – बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (vivek Agnihotri) यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files)या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

या चित्रपटानंतर आता विवेक अग्निहोत्री प्रेक्षकांसाठी नवीन काय घेऊन येणार किंवा त्यांचा आगामी चित्रपट कोणता असणार आहे याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं होतं. पण आता विवेक अग्निहोत्रींनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा करत सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. विवेक अग्निहोत्रींनी आता आगामी चित्रपट ‘दिल्ली फाइल्स’ (The Delhi Files) वर काम करायला सुरुवात केली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी आणखी एक ट्वीट करत त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. आपल्या या ट्वीटमध्ये त्यांनी आपल्या आगामी चित्रपटाचं नाव देखील सांगितलं आहे. ‘द दिल्ली फाइल्स’ हा विवेक अग्निहोत्रींचा आगामी चित्रपट असणार आहे.