Kangana Ranaut | “आठवड्याच्या सुट्टीची वाट पाहणं म्हणजे पाश्चिमात्यकरण”, कंगणा रणौतचा सुतोवाच

मंडीची नवनिर्वाचीत खासदार कंगना रणौत (MP Kangana Ranaut) तिच्या प्रोफेशनल लाईफ व्यतिरिक्त तिच्या पर्सनल लाईफबद्दलही खूप चर्चेत असते. याशिवाय अभिनेत्री तिच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. यावेळी अभिनेत्री कंगनाही संसदेत दिसणार आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथून तिने निवडणूक जिंकली. आता नुकतेच या अभिनेत्रीने वर्क कल्चरबद्दल असे काही लिहिले आहे, ज्यामुळे तुमची अस्वस्थता वाढेल. कंगना काय म्हणाली? ते जाणून घेऊया.

बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप नेत्या कंगना रणौतने (Kangana Ranaut) म्हटले आहे की ‘वेडगळ काम संस्कृती’ सामान्य केली पाहिजे आणि लोकांनी कामात आळशी होऊ नये. कारण भारत हा विकसित देश नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील पीएमओमधील संबोधनाचा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर शेअर करून अभिनेत्रीने आपले मत व्यक्त केले आहे.

कंगनाने पुढे लिहिले, “आम्ही ते लोक नाही ज्यांच्यासाठी ऑफिस यावेळी सुरू होते आणि यावेळी संपते. आम्ही ते लोक नाही, आम्हाला वेळेचे बंधन नसते, आमच्या विचारांना मर्यादा नसते आणि आमच्यासाठी कोणतेही मापदंड नाहीत.”

कंगनाने पुढे लिहिले की, “आम्हाला वेडसर वर्क कल्चर सामान्य करण्याची गरज आहे आणि वीकेंडची वाट पाहणे आणि सोमवारच्या मीम्सवर रडणे थांबवणे आवश्यक आहे. हे सर्व पाश्चिमात्य संस्कृतीचं उदात्तीकरण आहे… भारत अद्याप विकसित राष्ट्र नाही. त्यामुळे भारतीय पूर्णपणे आळशी आणि कंटाळवाणे होऊ शकत नाहीत.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार

Maharashtra Sadan In Ayodhya | अयोध्यत उभे राहणार महाराष्ट्र सदन, २.३२७ एकरचा भूखंडाला उत्तर प्रदेश सरकारची मंजूरी