Pune Crime | शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकी देणारा आरोपी ससून मधून फरार

Pune Crime | शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांना धमकावल्या प्रकरणी अटक आरोपी मार्शल लुईस लिलाकर (Marshall Louis Lilakar) वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले असताना पळून गेला. (Pune Crime)

सोशल मीडियावर रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना मार्शल लुईसने धमकावले (Pune Crime) होते. या प्रकरणी लिलाकरला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणले होते. त्यावेळी तो पोलिसांच्या तावडीतून निसटून पळून गेला.

सायबर पोलीस स्टेशनमध्ये मार्शलवर गुन्हा दाखल झाला होता. त्याला ९ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. पहाटे छातीत दुखत असल्याचं सांगितल्यानंतर त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आलं होतं. सायबर स्टाफच्या मदतीने त्याला ससून रुग्णलायत आणले होते. तिथे ओपीडीमधून सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मार्शल पळून गेला.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी