पद्मश्री किताब रस्त्यावर अन् खेळाडूंनी कुस्ती सोडल्यानंतर मोदी सरकारला अखेर जाग; कुस्ती महासंघाची उचलबांगडी

WFI Suspended: भारतीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी (24 डिसेंबर) मोठा निर्णय घेतला. त्यांनी नवनियुक्त भारतीय कुस्ती संघाला निलंबित केले आहे. खेळाडूंच्या विरोधामुळे मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. यंदा कुस्तीपटूंच्या विरोधानंतर भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांना कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. त्यानंतर निवडणुका झाल्या आणि ब्रिजभूषण शरण यांच्या निकटवर्तीय संजय सिंह (Sanjay Singh) यांनी निवडणूक जिंकली.

संजय सिंग अध्यक्ष झाल्यानंतर ज्येष्ठ कुस्तीपटू साक्षी मलिकने (Sakshi Malik) पत्रकार परिषदेत कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती. तिच्यानंतर बजरंग पुनिया (Bajarang Punia) याने पद्मश्री परत केला. त्यांच्याशिवाय हरियाणाचा पॅरा अॅथलीट वीरेंद्र सिंग याने पद्मश्री परत करण्याची घोषणा केली होती.

महत्वाच्या बातम्या-

“सीमा हैदरला कुणी ओळखतही नाही”, पाकिस्तानातून भारतात परतलेल्या अंजूने असे का म्हटले?

“आमची भांडणं फक्त मैदानात…”, विराटबाबत गौतम गंभीरच्या वक्तव्याने जिंकली मने

“ब्राह्मणांना आरक्षण नाही, हे परमेश्वराचे मोठे उपकार आहेत”, नितीन गडकरी यांचं मोठं विधान