लग्न करण्यापूर्वी मुलात कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत ?

आजकाल लग्न म्हणजे एक कमिटमेंट आहे असे पहिले जाते . पण लग्नाळू मुलींनो जर लग्न करायचा विचार करताय , आणि जर मुलं पाहण्याचा कार्यक्रम आखतंय तर नक्की काय बोलायचं ? काय विचारायच ? काय सांगायचं ? असे अनेक प्रश्न पडले असतील ना ? चला तर मग पाहुयात , लग्न करण्यापूर्वी मुलात कोणत्या गोष्टी पहिल्या पाहिजेत ?

१ . शिक्षण आपल्या बरोबरीचे असावे अथवा जास्त असावे , त्यामुळे विचारात साम्य होते आणि त्या एका कारणाने एकमेकांवर बुद्धी मत्तेचे ओरखाडे ओढायला नकॊ .

२. जोडीदाराकडून नक्की काय अपेक्षा आहेत ? असा स्पष्टच विचारा , अर्थात याचा उत्तर तुम्हाला स्पष्ट नाही मिळणार पण एकंदरीत विचहर समजायला मदत मिळेल . तुम्हाला लग्नानंतर बरोबरीचे स्थान मिळेल का याचा अंदाज घ्या . अर्थात मी लग्नानंतर शिकू शकते का ? नोकरी व्यवसाय करू शकते का ? जर लग्नानंतर मी नोकरी नाही करायचे ठरवले तर ? सर्वसामान्य निर्णय मी स्वतः घेऊ शकते का ? अर्थात नात्यात तुम्हाला कशी स्पेस मिळणार आहे हे समजेल , ज्यामुळे लग्न म्हणजे केवळ कमिटमेंट असे वाटणार नाही .

३ .मुलाच्या घरच्यांच्या सुने विषयी काय अपेक्षा आहेत ? त्या स्पष्ट करून घ्याव्यात, तरच होकार द्यावा अन्यथा स्वतः नकार देणे हिताचे . लग्नात दोन जीव एक होतात पण दोन कुटुंब देखील एक होतात . म्हणून आपल्या घरचे आचार विचार आणि मुलाच्या घरचे आचार काही प्रमाणात तरी जुळावेत असा अंदाज घ्यावा .

४ . आता आपण आपल्या अपेक्षेची यादी त्याच्यासमोर मांडावी . जर त्या प्रमाणे आपल्याला योग्य वाटले आणि तडजोड करण्याची तयारी असेल तरच होकार द्यावा .

५. दोघांचेही थोडेफार विचार जुळत असतील तरीही लगेच होकार कळवू नका . मुलाचे घर प्रत्यक्ष पाहून या , फोनवर बोला .

६ . पुढे सरकण्यापूर्वी तुम्ही बॅलन्स शीट , मार्क शीट , एक्सपेरिअन्स लेटर , सातबारा वैगरे पाहून झाले असेल तर हेल्थ सर्टिफिकेट पण मागा . कोणताही आजार असेंन तर त्या विषयी तुम्ही देखील स्पष्टपणे सांगा .
आता तुम्ही विचा करत असाल कि , यातील काही प्रश्न हे थेट नाहीत का ? तर नाही , कारण तुम्ही लग्न करून त्या घरच्या जबाबदाऱ्या , दुःख , संकट आणि सुख या सगळ्याचे वाटेकरी होणार आहेत . तसेच सध्याच्या या फसव्या जगात आपणं अलर्ट असणारेच आपल्या भविष्यासाठी गरजेचे आहे . त्यामुळे लग्न बंधनात अडकताना सुरुवात स्पष्टच करा .