कोंढा येथील शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा; मोर्चात महिला व बालकासह हजारो नागरीक सहभागी

अर्धापूर : तालुक्यातील कोंढा येथील कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही तसेच पिकांना पाणी मिळत नसल्याने पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वीज वितरण कंपनीने कोंढा येथील शेतीची विज सुरू करावी, या मागणीसाठी गावकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात महिला व बालकासह हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत.

कोंढा येथील शेतीची विज सुरू करावी यासाठी उपविभागीय सहाय्यक अभियंता यांच्याकडे प्रति २० हजार रूपये या प्रमाणे विज बील भरणा करण्यासाठी सर्व शेतकरी गेले असता त्यांनी पैसे स्वीकारण्यास असमर्थता दर्शवत पैसे परत केले.

गावच्या शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित विभागास आदेशीत करावे,अशी मागणी करण्यात आली होती. पण कोणीही गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे गुरुवारी कोंढा येथील शेतकऱ्यांनी बैलगाडी, ट्रॅक्टरसह मोर्चा काढला. या मोर्चात महिला व बालकासह हजारो नागरीक सहभागी झाले होते.