मुघलप्रेमातून केलेल्या ‘या’ वक्तव्यामुळे नसीरुद्दीन शाह ठरतायत टीकेचे धनी

नवी दिल्ली– वादग्रस्त वक्तव्ये करून फुकटची प्रसिद्धी मिळवण्याचा सध्या काही मंडळी प्रयत्न करताना दिसत आहेत. अशाच एका महाभागाचे नाव म्हणजे जेष्ठ अभिनेते नसरुद्दिन शाह. नसीरुद्दीन शाह हे यापूर्वी अनेकदा त्यांच्या वक्त्यांमुळे वादात अडल्याचं पहायला मिळालं आहे. आता पुन्हा एकदा शाह यांनी एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

शाह यांनी मुघलांना निर्वासित असं म्हटल्याने अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केलीय. मुघलांना भारतामध्ये कायमचं रहायचं होतं, ते भारताला त्यांची मातृभूमी बनवण्यासाठी आले होते, अशा अर्थाचं वक्तव्य शाह यांनी केलं आहे. शाह यांचा हे वक्तव्य करताना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

शाह म्हणाले, मुघलांनी केलेले अत्याचार हे अनेकदा दाखवले जातात. मात्र आपण हे विसरतो की मुघलांनी आपल्या देशाच्या जडघडणीमध्ये हातभार लावलाय. त्याच लोकांनी आपल्या देशामध्ये दिर्घकालीन परिणाम करणारी स्मारकं उभारलीयत, त्यांनी आपल्या देशातील नृत्य, संगीत, चित्रकला, साहित्या सारख्या कलांवर प्रभाव पाडलाय. हा देशच आपली मातृभूमी करण्याच्या उद्देशाने ते भारतात आलेले. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना निर्वासित म्हणू शकता,” असं शाह या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

https://twitter.com/Priyanshi135/status/1476405750352302088?s=20