Govt Scheme : श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना नेमकी काय आहे ? याचा लाभ कुणाला मिळतो ?

योजनेचे लाभार्थी

६५ वर्षावरील वयोवृद्ध निराधार पुरुष व स्त्री आणि ४० टक्के दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी ही योजना लागू आहे.

योजनेच्या अटी

• कौटुंबिक उत्पन्न २१ हजारापेक्षा कमी किंवा दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती.
• दिव्यांग व्यक्तींसाठी कौटुंबिक उत्पन्न ५० हजारापेक्षा कमी असावे.
• लाभार्थी किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
• लाभार्थी शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत नसावा.

आवश्यक कागदपत्रे
वयाबाबतचा पुरावा, रेशनकार्ड व आधार कार्डची छायांकित प्रत, नगरपंचायत/नगरपालिका/ग्रामसेवक यांच्याकडील दारिद्र्य रेषेखालील किंवा तहसिलदारांचा उत्पन्नाचा दाखला व मंडल अधिकारी व तलाठी अहवाल व जबाब इत्यादी.

मिळणारा लाभ
लाभार्थ्यांना प्रतिमाह १ हजार रुपये अनुदान दिले जाते. तथापि एक अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना १ हजार १०० व दोन व त्यापेक्षा अधिक अपत्य असलेल्या लाभार्थ्यांना १ हजार २०० प्रती लाभार्थी अर्थ सहाय्य देय आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक दाखले व प्रमाणपत्रासह अर्ज तहसिल कार्यालयात सादर करावा लागतो.

अधिक माहितीसाठी तहसील कार्यालयातील संबंधित शाखेत संपर्क साधावा