‘या’ भारतीय खेळाडूला मिळणार 12-13 कोटी रुपये, लिलावापूर्वी अश्विनचा अंदाज

IPL 2024 Auction: आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळलेल्या रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) त्याच्या एका ताज्या व्हिडिओमध्ये आयपीएल 2024 च्या लिलावाबाबत काही खास आणि मोठी भविष्यवाणी केली आहे. आयपीएल 2024 ची तयारी सुरू झाली आहे. आयपीएल संघांनी पुढील हंगामासाठी त्यांचे खेळाडू सोडले आणि कायम ठेवले आहेत. आता सर्व क्रिकेट चाहत्यांना 19 डिसेंबरला दुबईत होणाऱ्या आयपीएलच्या लिलावाची प्रतीक्षा आहे.

IPL लिलावात कोणाला जास्त पैसे मिळणार?
आगामी लिलावात भारतीय आणि परदेशी खेळाडूंवरही मोठ्या प्रमाणात बोली लागण्याची अपेक्षा आहे. भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याला विश्वास आहे की या आयपीएल लिलावात सोडण्यात आलेले काही खेळाडूंवर मोठ्या बोली लागू शकतात.

त्याच्या यूट्यूब चॅनलवर याबद्दल चर्चा करताना अश्विन म्हणाला की, मी शाहरुख खानसाठी सीएसके आणि गुजरातमध्ये लढत पाहत आहे. गुजरातने हार्दिक पांड्याला सोडले आहे, त्यामुळे आता त्यांना अशा खेळाडूची गरज आहे जो त्यांच्यासाठी खेळ पूर्ण करू शकेल. त्यांच्या संघात पॉवर हिटर्सची कमतरता आहे आणि त्यांना पॉवर हिटर्सची गरज आहे. मला वाटते की लिलावात त्याच्यावरील बोली 12-13 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या-