अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नागरिकांसाठी विशेष घटक योजना नेमकी काय आहे? 

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नागरिकांसाठी विशेष घटक योजना

योजनेचे स्वरुप:
शासनाच्या २० कलमी कार्यक्रमांतर्गत कलम ११ अ अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाद्वारे या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

लाभाचे स्वरुप:
अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्तीना त्यांच्या गरजेनुसार वित्तीय संस्थाकडून कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. या कर्जावर मंडळाकडून विशेष केंद्रीय सहाय्यातून रक्कम रुपये १० हजारापर्यंत अथवा मंजूर कर्जाच्या ५० टक्के यापैकी कमी असणारी रक्कम लाभधारकास अनुदान स्वरुपात मंजूर करण्यात येते.

अटी व शर्ती:
• ग्रामीण भागातील उमेदवारासाठी ४० हजार ५०० रुपये व शहरी भागातील उमेदवारासाठी ५१ हजार ५०० रुपये  इतकी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा.
• वयाच्या १८ वर्षावरील बेरोजगार, पारंपारिक कारागिर तसेच महिला बचत गट लाभ घेण्यास पात्र.
• एका कुटुंबातील एका व्यक्तीस अनुदानाचा लाभ.
• बचत गटाचा ठराव आवश्यक

आवश्यक कागदपत्रे:
• कर्ज मागणी अर्ज व छायाचित्रे
• शिधापत्रिका,पॅनकार्ड, आधारकार्ड
• रहिवासी व ओळख प्रमाणपत्र (नगरसेवक /ग्रामसेवकाने दिलेले), मतदान ओळखपत्र
• उद्योग अनुभवाचा दाखला किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्र
• उत्पन्नाचा दाखला (तहसील कार्यालयाचे)
• जातीचे प्रमाणपत्र
• जागेचा पुरावा (घरपट्टी,  कर भरल्याची पावती, नमुना क्र. ८ अ )
• जागा स्वतःची नसल्यास जागामालका सोबत करारपत्र / संमतीपत्र
• बचत गटाचे सदस्य असल्याचे प्रमाणपत्र (ग्रामसेवक)

संपर्क:- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, २४ ब, पुणे-मुंबई रस्ता, शासकीय दूध डेअरी समोर, खडकी, पुणे-३  दू.क्र. ०२०-२५८११८५९