‘पवार साहेब ज्या वेळेस निवडणूक हारणार आहे हे माहीत असते त्यावेळेस ते न लढताच मैदान सोडून पळतात’ 

मुंबई – केंद्रातील सत्ताधारी भाजपाने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली असून सर्व विरोधकांनी राष्ट्रपतीपदासाठी सक्षम उमेदवार ठरवावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे. मात्र शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात ही निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. विरोधी पक्षांच्या बुधवारी झालेल्या या बैठकीत अनेक पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना संयुक्त विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्यासाठी विनंती केली, मात्र त्यांनी पुन्हा एकदा ही ऑफर धुडकावून लावली.

दरम्यान, आकड्याचं गणित पाहाता सत्ताधारी एनडीएकडे आघाडी आहे. त्यात जर बीजद, ऑल इंडिया अन्ना द्रविड मुनेत्र कषगम (अन्नाद्रमुक) आणि युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टी (वाईएसआरसीपी) यासारख्या पक्षाचं समर्थन मिळाल तर एनडीएच्या उमेदरावाचा विजय निश्चित मानला जातोय.

या पार्श्वभूमीवर भाजपनेते प्रदीप गावडे यांनी एक फेबुक पोस्ट केली असून यात त्यांनी पवारांची खिल्ली उडवली आहे. पवार साहेब अजिंक्य योध्ये आहेत कारण ज्या वेळेस निवडणूक हारणार आहे हे माहीत असते त्यावेळेस ते न लढताच मैदान सोडून पळतात, मग ती निवडणूक माढ्यातून लोकसभेची असो किंवा राष्ट्रपती पदाची असो! असं गावडे यांनी म्हटले आहे.