काळे फासण्याला जबाबदार कोण? नामदेव जाधव म्हणाले, “हे सर्व १०० टक्के…”

Namdev Jadhav : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आरोप करणाऱ्या नामदेव जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पवारांवर सततचे आरोप केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या चेहऱ्याला काळं फासलं आहे.

दरम्यान, पवार समर्थकांनी नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासत असताना पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. जाधवांना काळे फासण्यात पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. दरम्यान, आता शाईफेक झाल्यानंतर याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी स्वीकारली आहे.

यावर आता नामदेव जाधव यांनी देखील प्रतिक्रिया दिली. नामदेव जाधव म्हणाले, याला रोहित पवार जबाबदार आहे. लोकशाहीत अशी गुंडागर्दी करणं शोभणारं नाही. हे सर्व १०० टक्के रोहित पवारांनी करायला लावलं आहे. या प्रकारानंतर तक्रार कुणाविरोधात करायची याबाबत मी माझ्या वकिलांशी बोलणार आहे.”

महत्वाच्या बातम्या-