२५ डिसेंबरला जरांगे – पाटील सांताक्लॉज बनून येणार का? राज ठाकरेंची मिश्कील टिपण्णी

२५ डिसेंबरला जरांगे - पाटील सांताक्लॉज बनून येणार का? राज ठाकरेंची मिश्कील टिपण्णी

Raj Thackeray On Manaoj Jarange : मनोज जरांगे यांना भेटून सांगितलं होतं असं कोणतंच आरक्षण (Maratha Reservation) कधीही मिळणार नाही. मुळात त्यांच्या मागे कोण आहे, कोण बोलायला सांगत आहेत, निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव होत आहेत, हे लवकरच समोर येईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) म्हणाले. येत्या २४ डिसेंबरपर्यंतचा जरांगे – पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टीमेटमबाबत ठाकरे यांना पत्रकारांनी विचारले असता २५ डिसेंबरला ते  काय सांताक्लॉज बनून येणार आहेत का? अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरे यांनी याप्रसंगी केली.

मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी अनेक विषयावर आपली मत मांडली. ते म्हणाले, या आरक्षण प्रकरणामुळे जातीयवाद निर्माण करून राज्यातील सुव्यवस्थेचा भंग करायचा असं कोणी ठरवलं आहे का? निवडणुका तोंडावर असताना अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. मला हे सगळं चित्र सरळ दिसत नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, या सगळ्यामुळे मुळ मुद्दे भरकटले जात आहेत. इतरही अनेक महत्त्वाचे विषय आहेत, परंतु, तुम्हाला वेगळ्या मुद्यांमध्ये गुंतवून ठेवलं जात आहे. ज्या गोष्टींमुळे लोक त्रस्त आहेत ते विषय जनतेच्या डोक्यात येता कामा नये, असा प्रयत्न होतोय. लोकांचं लक्ष वेगळ्या गोष्टींकडे वळवलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…

 

 

Previous Post
मनोज जरांगेंच्या मागून कोण बोलतंय हे लवकरच समोर येईल : Raj Thackeray

मनोज जरांगेंच्या मागून कोण बोलतंय हे लवकरच समोर येईल : Raj Thackeray

Next Post
हेमंत रासने यांनी करून दाखवलं, कसब्यातील जुने वाडे अन इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

हेमंत रासने यांनी करून दाखवलं, कसब्यातील जुने वाडे अन इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

Related Posts
राम सातपुते

कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंगांचे वाटप; राम सातपुते यांनी डागली सरकारवर तोफ

बुलडाणा  : वाढती लोकसंख्या ही देशासमोरील एक मोठी समस्या आहे. यामुळेच लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपापाययोजना…
Read More
मोठी बातमी! मॉरिसभाईने आधी ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळ्या झाडल्या, नंतर ...; मुंबई हादरली

मोठी बातमी! मॉरिसभाईने आधी ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळ्या झाडल्या, नंतर …; मुंबई हादरली

Abhishek Ghosalkar  – शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक…
Read More
कॅप्टन-भाजप युतीमुळे नेमका कुणाचा होणार फायदा ?

कॅप्टन-भाजप युतीमुळे नेमका कुणाचा होणार फायदा ?

चंडीगड – पंजाबमधील निवडणूक मोठी रंगतदार बनत चालली आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस…
Read More