होय… आम्हीच नामदेव जाधव यांच्यावर शाईफेक केली – प्रशांत जगताप 

Namdev Jadhav : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आरोप करणाऱ्या नामदेव जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पवारांवर सततचे आरोप केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या चेहऱ्याला काळं फासलं आहे.

दरम्यान, पवार समर्थकांनी नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासत असताना पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. जाधवांना काळे फासण्यात पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. नामदेव जाधव हे सातत्याने वादग्रस्त विधान करीत होते. त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन महाविद्यालय येथे होणाऱ्या नामदेव जाधव यांच्या कार्यक्रमाला विरोध केला होता तसेच त्यांनी जाधव यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला होता.

दरम्यान, आता  शाईफेक झाल्यानंतर याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी स्वीकारली आहे. प्रशांत जगताप म्हणाले, “या आंदोलनाची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. नामदेव जाधवांना खंडणीच्या गुन्ह्यात विक्रोळी पोलिसांनी अटक केली होती. तसेच, पैसे घेऊन मुलांचे गुण वाढल्याप्रकरणी शाळेतून जाधवांची हकालपट्टीही झाली होती. आता जाधव शरद पवारांवर टीका करत आहेत.

लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार नक्की आहे. पण, खऱ्या पुराव्यांच्या आधारावर टीका करावी. शरद पवारांवर नाहक खोटे आरोप करण्यात येत होते. नामदेव जाधवांना टीका करू नका, इसा इशाराही दिला होता. पण, ते थांबले नाहीत. म्हणून जाधवांना कार्यकर्त्यांनी काळ फासले, असं स्पष्टीकरण प्रशांत जाधवांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-