सरस्वती देवीची पूजा का करायची ? तिने फक्त 3% लोकांना शिकवलं; भुजबळ बरळले 

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत.  ‘शाळेत शारदा, सरस्वती मातेचा फोटो का ? ज्या मातेला आम्ही कधी पाहिलं नाही. कधी आम्हाला शिकवलं नाही. शिकवलं असेल तर केवळ तीन टक्क्यांना शिकवलं. आम्हाला दूर ठेवलं. त्यांची पूजा कशासाठी करायची ? देशातील महापुरूष तुमचे देव असले पाहिजे. देशात महापुरूषांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले.

देवी सरस्वतीला कुणी पाहिले आहे का? पाहिले असेल तरी फक्त 3% लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल असं म्हणत भुजबळ यांनी जातीयवादी फुत्कार सोडले. शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? शाळांमध्ये फुले, आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा अशी मागणीही भुजबळांनी केली. या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा जातीयवादी चेहरा समोर आला असून या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली आहे.

भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आपल्या भाषणामध्ये छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू यांचे फोटो लावले पाहिजेत कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला असं विधान केलं. मात्र यावेळी त्यांनी हिंदू देवींच्या फोटोंचा उल्लेख केला. “शाळेमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावला पाहिजे. महात्मा फुलेंचा लावला पाहिजे. शाहू महाराजांचा फोटो लावा पाहिजे. बाबासाहेबांचा लावा फोटो. कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची?” असं विधान छगन भुजबळ यांनी केलं.