भाजपच्या ढाण्या वाघाला जामीन मंजूर, नितेश राणेंना मोठा दिलासा !

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहेत. त्यांना हा जामीन ३० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. संतोष हल्ल्याप्रकरणी त्यांना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. नितेश राणे यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परबलाही सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

जिल्हा सत्र न्यायालयात नितेश राणे यांच्या जामीनसाठी अर्ज करण्यात आला होता. त्यात दोन ते तीन दिवस सुनावणी झाली. युक्तिवाद झाला. त्याठिकाणी अनेक मुद्दे मांडले गेले. ते मुद्दे दोन्ही बाजूंच्या वकिलांनी खोडून काढले होते. या सगळ्या युक्तिवादाचा विचार करत नितेश राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु प्रकृती अस्वस्थतामुळे नितेश राणे हे कोल्हापूरच्या रूग्णालयात दाखल आहेत. त्यानंतर आता त्यांच्या सुटकेची पुर्तता करण्यात येईल. तसेच चार्जशीट दाखल होईपर्यंत नितेश राणे यांना आठवड्यातून एकदा पोलीस ठाण्यात यावं लागणार आहे. तसेच त्यांना तोपर्यंत कणकवलीत येण्यास देखील बंदी घातली आहे.

१८ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या तत्कालीन बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा प्रचार करून घरी परतत असतांना शिवसैनिक संतोष परब यांच्या दुचाकीला इनोव्हा गाडीने पाठीमागून धडक दिली होती. त्यानंतर संतोष परब हे जमीनीवर पडले. व त्यांच्यावर संशयितांनी छातीवर धारदार वस्तूने हल्ला केला. अशी तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. यानंतर याप्रकरणी चौघांना फोंडाघाट तपासणी नाक्यावर ताब्यात घेण्यात आले होते. तर सचिन सातपुते याला दिल्लीतून अटक करण्यात आली होती. तर आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, आमदार राणे यांचे खाजगी सचिन राकेश परब यांच्या नावाचा उल्लेख पोलिसांना तपासात आढळून आला.