यूट्यूबर अरमान मलिकच्या दोन्ही पत्नी एकदाच झाल्या प्रेग्नेंट; नेटकरी म्हणाले, ‘हे कसं शक्य आहे?’

यूट्यूबर अरमान मलिक (YouTuber Armaan Malik) इंटरनेटच्या दुनियेत भरपूर प्रसिद्ध आहे. अरमानने दोन लग्न केली असून त्याच्या दोन्ही पत्नी एकाच घरात राहतात. बऱ्याचदा अरमान त्याच्या पत्नींसोबतचे व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर करत असतो. चाहत्यांनाही त्याचे व्लॉग प्रचंड आवडतात. यूट्यूबवरील व्हिडिओंबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अरमान चर्चेत असतो. नुकताच अरमानने एक असा खुलासा केला आहे, ज्यामुळे नेटकरी गोंधळले आहेत व त्याला ट्रोल करू लागले आहेत.

असा काय केला खुलासा?
यूट्यूबर आणि सोशल मीडिया इंफ्लुएंसर अरमान मलिक याच्या दोन्ही पत्नी पायल मलिक आणि कृतिका मलिक गरोदर आहेत. अरमानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे याबद्दल खुलासा केला आहे. त्याने त्याच्या दोन्ही पत्नींसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये त्याच्या पत्नी त्यांचा बेबी बंप दाखवताना दिसत आहेत. अरमानने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, माझे कुटुंब असे लिहिले आहे.

अरमानच्या पत्नी पायल मलिक आणि कृतिका मलिक या दोघीही कंटेट क्रिएटर आहेत. पत्नी पायलकडून अरमानला एक मुलगादेखील आहे. मात्र आता या दोघीही एकाचवेळी गरोदर झाल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अरमानने त्याच्या पत्नींच्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्यानंतर त्याच्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्याला या आनंदाच्या बातमीसाठी त्याचे अभिनंदन केले आहे. तर काहींनी त्याला ट्रोल केले आहे. एकदाच दोघी कशा गरोदर होऊ शकतात, हे कसे शक्य आहे?, असे प्रश्न नेटकऱ्यांनी अरमानला केले आहेत.