“शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी…”, प्रसिद्ध अभिनेत्रींचा तरुणांना रिलेशनशीपबद्दल मोठा सल्ला

Relationship Tips: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमान (Zeenat Aman) यांनी तरुणांना रिलेशनशिपबद्दल मोठा सल्ला दिला आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने शारीरिक संबंधांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीने तरुणांना रिलेशनशिपबद्दल दिलेल्या सल्ल्याची चर्चा रंगत आहे.

जीनत अमान म्हणाल्या. ‘मला या गोष्टीची खंत वाटते. पण मला असं वाटतं नात्यामध्ये शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी काही काळ प्रतीक्षा करायला हवी. एवढंच नाही तर, स्वतःवर नियंत्रण देखील असायला हवं. दोघांनी देखील एकमेकांसाठी प्रतीक्षा करायला हवी. कारण हे नातं फार अनमोल असतं आणि त्याला टिकवून ठेवणं तितकचं कठीण असतं,’ असं जीनत अमान म्हणाल्या.

‘प्रत्येक महिलेने आत्मविश्वास बाळगला पाहिजे, स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले पाहिजे. ज्यामुळे महिला आत्मनिर्भर होतात. एवढंच नाही तर, त्या स्वतःचा निर्णय स्वतः घेवू शकतात. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणे म्हणजे केवळ स्वतःचा पैसा असणे असं होत नाही. तुम्ही इतरांवर अवलंबून न राहता आणि स्वतःच्या अटींवर जीवन जगण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळत असतं.. तसेच स्वतःचा सुधारण्याचा देखील हा उत्तम मार्ग आहे,’ असा मोलाचा सल्लाही जीनत अमान यांनी महिलांना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनाची आतुरता संपली! पाहा गणपती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि साहित्य यादी

Ganesh Utsav 2023: भगवान गणेशाच्या ‘या’ १२ अवतारांचे आहे खास महत्त्व, वाचा बाप्पांबद्दल खास गोष्टी

Ganesh Chaturthi 2023: अशा प्रकारे घरी बनवा गणपतीचा आवडता मोदक, सर्व इच्छा होतील पूर्ण!