6 विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद सिराजवर श्रद्धा कपूर नाराज; फायनल मॅचनंतर अभिनेत्रीकडून सवाल

Shraddha Kapoor: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात आज कोलंबोच्या मैदानावर आशिया चषकाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागेल. श्रीलंकेचा संघ अवघ्या ५० धावांवर बाद झाल्याने भारताला सोपे लक्ष्य मिळाले. भारताच्या सलामी जोडीने ७ षटकातच लक्ष्य गाठत आशिया चषक जिंकला. आशिया चषकावर आपले नाव कोरण्याची ही भारताची आठवी वेळ आहे.

या सामन्याचा खरा शिल्पकार राहिला मोहम्मद सिराज. सिराजने (Mohammed Siraj) ७ षटके टाकताना केवळ २१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. त्याच्या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले

एकीकडे मोहम्मद सिराजची सोशल मीडियावर प्रशंसा होत असताना दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने मात्र त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मॅच संपल्यानंतर श्रद्धा कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सिराजसाठी एक पोस्ट लिहिली आहे. श्रद्धाच्या या पोस्टवरून ती सिराजवर नाराज असल्याचं दिसून येत आहे.

सिराजमुळे रविवारचा दिवस वाया गेला असं तिने अप्रत्यक्षपणे म्हटलंय. कारण भारताविरुद्ध श्रीलंकेचा हा सामना अवघ्या अडीच तासातच संपला.

श्रद्धाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, ‘आता सिराजलाच विचारा की या मोकळ्या वेळेत काय करावं?’ श्रद्धाचा रविवारचा प्लॅन हा रात्री उशिरापर्यंत मॅच पाहण्याचा होता. मात्र 51 धावांचंच लक्ष असल्याने अडीच तासात मॅच संपली. त्यामुळे उरलेल्या वेळेचा काय करावा असा प्रश्न श्रद्धाला पडला. म्हणूनच श्रद्धाने सिराजसाठी ही पोस्ट लिहिली.

महत्त्वाच्या बातम्या-
Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनाची आतुरता संपली! पाहा गणपती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि साहित्य यादी

Ganesh Utsav 2023: भगवान गणेशाच्या ‘या’ १२ अवतारांचे आहे खास महत्त्व, वाचा बाप्पांबद्दल खास गोष्टी

Ganesh Chaturthi 2023: अशा प्रकारे घरी बनवा गणपतीचा आवडता मोदक, सर्व इच्छा होतील पूर्ण!