किरण मानेंनी इतर कलाकारांना  त्रास दिला, योग्य वेळेस उत्तर देऊ – मनसे 

मुंबई – स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ( mulgi zali ho ) या लोकप्रिय मालिकेत अभिनेते किरण माने विलास पाटालाची भूमिका साकराताना दिसतात. अभिनेते किरण माने त्यांच्या भूमिकेमुळे जितके चर्चेत असतात तितकेच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असतात. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात.

दरम्यान, आता भाजपविरोधी राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण माने यांनीच यासंदर्भात खुलासा करत राजकीय भूमिकेमुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (amey khopkar) यांच्याशी टीव्ही 9 मराठीने संपर्क केला. यावेळी ते फार काही बोलले नाहीत मात्र मोजक्या शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,  मला या प्रकरणावर काही बोलायचं नाही, किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला. योग्य वेळी याबाबत आम्ही भुमिका घेऊ, असं त्यांनी सांगितलं.