… म्हणून ‘या’ पठ्ठ्याने 50 किलो डायनामाइटने उडवली स्वतःची 75 लाख रुपयांची इलेक्ट्रिक कार

नवी दिल्ली : टेस्ला कार मालकाने नाराज होऊन स्वतःचीच कार स्फोटकांनी उडवल्याची घटना समोर आली आहे. टेस्ला मॉडेल एस कार मालक नाराज झाला आणि त्याने 50 किलो डायनामाइटने 75 लाख रुपयांची इलेक्ट्रिक सेडान कार उडवली. ही घटना फिनलंडमधील आहे जिथे 2013 च्या टेस्ला मॉडेल एस (2013 मॉडेल एस सेडान) वर नाखूष असलेल्या टुमास काटेनेनने 50 किलो डायनामाइटने स्वतःची कार उडवली.

अहवालानुसार, टेस्ला मॉडेल एसच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये दिसणार्‍या मल्टिपल एरर कोडमध्ये दोष होता, त्यानंतर कार टेस्ला सर्व्हिस सेंटरमध्ये नेण्यात आली. एक महिना वाट पाहिल्यानंतर, कार मालकाला टेस्लाकडून माहिती मिळाली की संपूर्ण बॅटरी पॅक बदलल्याशिवाय सेडानची दुरुस्ती केली जाऊ शकत नाही, ज्यासाठी त्याला $22,480 खर्च येईल.

ही कार सुमारे आठ वर्षे जुनी होती, त्यामुळे कंपनीकडून तिच्या बॅटरीसाठी कोणतीही वॉरंटी दिली जात नव्हती. यामुळे दु:खी झालेल्या कार मालकाने 50 किलो डायनामाइट टाकून कार उडवली. कारचा स्फोट करण्यापूर्वी कार मालकाने टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांचा पुतळा कारमध्ये ठेवला होता.

दरम्यान, ही इलेक्ट्रिक कार भारतात 2022 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. टेस्ला मॉडेल एस ची भारतातील अंदाजे किंमत सुमारे 1.50 कोटी रुपये (एक्स-शोरूम) असू शकते. तथापि, यूएस मध्ये त्याची किंमत $ 99,490 आहे, ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये 75 लाख रुपये आहे.