नदीत सापडले तब्बल 50 किलो चांदीचे शिवलिंग, लोकांची तुफान गर्दी

दोहरीघाट – दोहरीघाट शहरातील रामघाट (Ramghat) येथे शनिवारी घाघरा नदीत 50 किलो वजनाचे चांदीचे शिवलिंग सापडले. चांदीच्या शिवलिंगाच्या अशाप्रकारे सापडण्याला लोक चमत्कार मानत आहेत. तसेच हे शिवलिंग अलौकिक असल्याचे बोलले जात आहे. काही वेळातच 50 किलो वजनाचे शिवलिंग (Shivling) मिळाल्याची माहिती पसरली आणि ते पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, दोहरीघाट शहरातील भगवानपुरा येथील रहिवासी राम मिलन साहनी शनिवारी नदीच्या काठावर भांडी धुत होते. त्याचवेळी त्याला नदीत काहीतरी चमकताना दिसले. राम मिलन साहनी जवळ जाऊन पाहिलं तर चमकणारी गोष्ट शिवलिंग होते. यानंतर चांदीचे शिवलिंग नदीत सापडल्याची बातमी वेगाने पसरली आणि त्यानंतर शिवलिंग पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली.

राम मिलन साहनी यांनी शिवलिंग नदीतून बाहेर काढून त्याची विधिवत पूजा केली. नंतर शिवलिंग दोहरीघाट पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. वृत्त लिहेपर्यंत शिवलिंग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. या संदर्भात पोलीस अधिकारी मनोज कुमार सिंह यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मीटिंगमध्ये स्वत:हून पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर शिवलिंग पाहिल्यानंतरच काही सांगता येईल, असे सांगितले.