संतापजनक : शिक्षिकेवर २९ वर्षे अत्याचार केल्याचा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर आरोप

सोलापूर : सोलापूरचे माजी महापौर, राष्ट्रवादीचे नेते मनोहर सपाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एका शिक्षिकेने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या शिक्षिकेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सपाटेंवर खंडणीचा, अनैसर्गिक अत्याचार अन् अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. ( Manohar Sapate latest news). त्यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात खंडणीसह अनैसर्गिक अत्याचार अन् अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. (solapur latest marathi news).

याबाबत मिळालेल्या माहिती अशी – पीडित महिला ही विधवा होती. तिच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवत सपाटे यांनी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तिने विरोध केल्यानंतर तुला संस्थेतून काढून टाकेन तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करेन असे धमकावत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. तिने याबाबत एकदा विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठल्यानंतर तिच्यावर दबाव आणत तक्रार मागे घेण्यास भाग पाडले हाेते.

पीडित विधवा महिलेने दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, सोलापुरातील एका खाजगी संस्थेत एका कार्यक्रमासाठी सोलापूरचे प्रथम नागरिक व महापौर या नात्याने मनोहर सपाटे यांना बोलावण्यात आले होते. त्या खाजगी संस्थेत नोकरीला असणाऱ्या विधवा महिलेवर मनोहर सपाटेची वाईट नजर पडली.

कार्यक्रमानंतर तत्कालीन महापौर सपाटे याने विधवा महिलेस कार्यालयात तू जवानीमध्ये विधवा झाली, तू माझे ऐकत जा, तू मला खूप आवडतेस, माझ्यासोबत शारीरिक संबंध (Physical relationship) ठेव अन्यथा तुला नोकरी वरून काढून टाकतो अशी धमकी देत , १५ ऑगस्ट १९९३ साली पहिल्यांदा अत्याचार केला, असा थेट आरोप पीडित महिलेने केला आहे. त्यानंतर अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन माझ्यावर सपाटे यांनी नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केला अशी फिर्याद सदर महिलेने सोलापूर शहर येथील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली आहे.