मोहन भागवतांच्या राजकारण्यांना कानपिचक्या; म्हणाले, राजकीय हितापेक्षा…

पणजी – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) शनिवारी गोव्यामध्ये होते. त्यांनी संध्याकाळी पणजीतील विराट सभेत गोव्यातील (Goa) संघ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांना काही मोलाचे सल्ले दिले आहेत. राजकीय हितापेक्षा समाजातील, तळागाळातील लोकांसाठी काम करा असा सल्ला दिला. तुम्ही राजकारणात (Politics) किती प्रबळ झालात, शक्तिशाली झालात यापेक्षा तुम्ही तळागाळातील लोकांसाठी किती काम केले त्यांचा विकास केला हे महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले.

मोहन भागवत पुढे म्हणाले, भाजपला (BJP) सत्तेची मूळ घट्ट करायची असली तरी त्यांनी इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना पक्षात सामावून घेताना शिस्त आणि प्रामाणिकपणाचे धडे द्यावे. त्यांना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) शिस्त लावा, त्याप्रमाणे काम करून घ्या असाही सल्ला त्यांनी आपल्या भाषणात दिला.