वेदांतानंतर ‘फोन पे’ची बारी, गब्बर होतायेत शेजारी….; रोहित पवारांचं सरकारवर टीकास्त्र 

मुंबई :  वेदांत फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प गुजरातला गेल्यामुळं शिंदे-फडणवीस सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. बल्क ड्रग पार्क प्रकल्पही परराज्यात गेला असताना आता पुन्हा एकदा नव्या कंपनीच्या वादामुळं राजकीय वातावरण तापलं आहे.

वेदांतानंतर आता फोन पे कंपनीचा (Phone Pay headquarter) मुंबईतील मुख्यालय कर्नाटकात हालवणीच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. वेदांतानंतर ‘फोन पे’ची बारी,गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी, व्वा रे सत्ताधारी, असं ट्विटमध्ये म्हणत पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.